‘अभ्यासात मागे पडणारी मुलं’ हा शिक्षक, पालक सर्वांच्याच चिंतेचा विषय! गतिमंदत्व, मतिमंदत्व, स्वमग्नता, बहुविकलांगता इतर शारीरिक ,मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग, अतिचंचलता या कारणांमुळे सर्वसाधारणतः मुलं अभ्यासात माग पडतात. पण यापेक्षा वेगळा असणारा मुलांचा एक गट आहे जो आपल्या सर्वांनाच बुचकळ्यात टाकतो. या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नसतं, ती दिसतातही चारचौघांसारखी! त्यांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली, उत्तम, अतिउत्तम असते. विषय आकलन चांगलं होत असल्यानं ही मुलं तोंडी उत्तरही व्यवस्थित देऊ शकतात. पण लेखी परीक्षेत मात्र ती नापास होतात. ही मुलं म्हणजेच ‘अध्ययन समस्या’ असलेली मुलं!
“डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान---मैत्र” या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ‘अध्ययन समस्या’ असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो. आमच काम शिक्षक, पालक, ही मुलं या तिन्ही पातळ्यांवर चालत. या मुलांना केवळ ‘शिकवणी’ला पाठवून, त्यांना शिक्षा करुन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वानीच हा विषय समजावून घेणं आणि एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे.
Dr. Shanta Vaidya Memorial Foundation (DSVMF) works with children having Specific Learning Difficulties (SLD). Since last 9 years, DSVMF has been working with children, parents, teachers and schools in Pune and surrounding districts of Maharashtra.
Tuesday, 22 May 2018
Wednesday, 18 April 2018
'अध्ययन आक्षमतेला ' समजून घेण्याची गरज - महाराष्ट्र टाइम्स, ८ ऑक्टोबर २०१६
'अध्ययन आक्षमतेला ' समजून घेण्याची गरज
ऑक्टोबर महिना जगातील काही देशांमध्ये अध्ययन अक्षमता जाणीव जागृती
महिना म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्ताने ....
ऑक्टोबर महिना जगातील काही देशांमध्ये ‘अध्ययन अक्षमता जाणीव जागृती महिना’ म्हणून ओळखला जातो. एक अख्खा महिना
स्वतःसाठी राखून ठेवणारा हा विषय नेमका काय आहे, हे समजावून
घेण्याची गरज आहे.
अध्ययन अक्षमता म्हणजे सर्वसाधारण, चांगली, उत्तम,
अतिउत्तम
बुद्धिमत्ता असतानाही लेखन, वाचन, गणित अशी
शैक्षणिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी मुलांना येणारी अडचण. या प्रमुख अडचणींबरोबरच
दिशा कळण्यामध्ये गोंधळ होणे, वेळ चटकन न समजणे, वयानुरूप
अपेक्षित असलेले अंतराचे, आकारमानाचे, वजनाचे अंदाज
बांधता न येणे, पाढे, कविता, प्रार्थना पाठ न होणे अशी काही छोटी छोटी लक्षणेही या मुलांमध्ये
दिसतात. विश्वास बसणे अवघड आहे पण
वस्तुस्तिथी अशी आहे, की कोणतेही शारिरिक, मानसिक, बौद्धिक व्यंग
नसतानाही ही मुले अभ्यासात मागे पडत असतात. यांच्या वह्या, परीक्षेतील पेपर
पूर्ण होत नाहीत. विषय समजतो,
तोंडी उत्तर देता येतात पण परीक्षेत गुण मिळवता येत नाहीत. हि मुले गतिमंदत्व, मतिमंदत्व,
स्वमग्नता,
बहुविकलांगता,
सेलेब्रल
पाल्सी अशा कोणत्याच गटात मोडत नाहीत आणि
तरीही शिक्षणात मागे पडत असतात. याला ‘छुपे अपंगत्व’
असे म्हणतात. त्यांच्यावर शिक्के मारून त्यांना बाद करणे हि आपली प्रतिक्रिया,
हा
परिणाम आहे या आपल्या या विषयातल्या अपुऱ्या माहितीचा.
आनुवंशिकतेमुळे असणारी मेंदूमधील भिन्न रचना हे अध्ययन अक्षमतेचे
प्रमुख कारण आहे. अनुवंशिकता नसतानाही क्वचित कधी तरी जन्माच्या वेळी झालेल्या
गुंतागुंतीमुळे मुलांमध्ये अध्ययन अक्षमता दिसून येते. या रचनाभिन्नतेमुळे मुलांना
पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेण्यात अडचण येते. पण याचा अर्थ हि मुले शिकू शकत नाहीत
असा नाही. 'रेमेडील टीचिंग' हा त्यावरच उपाय आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये या विषयावरचे काम १८३० मध्ये सुरु झाले.
त्यानंतर या विषयांवरचे संशोधन अव्याहत सुरु आहे. निरनिराळ्या पद्धती, साधने
उपलब्ध आहेत. यातून एक गोष्ट सिद्ध झाली, कि या मुलांना अभ्यासात अडचण असली
तरीही त्यांची बहुविध बुद्धिमत्ता खूप चांगली असते. ही मुले संशोधक, नेते,
समाजसेवक,
कलाकार,
उद्योजक
होऊ शकतात. चर्चिल, एडिसन, आईन्स्टाईन, वॉल्ट डिस्ने, हेन्री फोर्ड ही
या गटातील सुरवातीची काही यशस्वी उदाहरणे होय. ही परंपरा तिथे अजूनही चालूच आहे.
भारतात या गटात मोडणाऱ्या मुलांच्या बहुविध बुद्धिमत्तेचा उपयोग करून
त्यांना पुढे नेणे घडत नाही. आपण
ज्या पद्धतीने त्यांना वागवतो, त्यामुळे
त्यांच्यामध्ये नैराश्य, आत्मविश्वासाचा
अभाव, अतिचिंता, न्यूनगंड यासारख्या नकारात्मक भावना
निर्माण होतात. सुमारे ७९% मुलांमध्ये या गोष्टी आढळतात (संदर्भ- निमहान्स या बंगळुरू संस्थेतील अभ्यास) यातूनच मग इतर
सामाजिक प्रश्न तयार होतात. जागतिक स्तरावरचे सर्वेक्षण असे सांगते, की जगभरातील दहा टक्के लोकसंख्या या
गटात मोडते. (संदर्भ- हँडबुक व पुअर स्कूल परफॉर्मन्स, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन,
दिल्ली २००२) भारताचा विचार करता हा
आकडा खूप मोठा होता. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार भारतभरात शालेय शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांची आज २४ कोटी ८२ लाख ५१हजार ५५६ संख्या आहे. देशभरात दोन कोटी ४८
लाख २५ हजार १५५ मुलांकडे आपण लक्ष देण्याची व मदतीची गरज आहे.
क्षिप्रा रोहित
डॉ. शांत वैद्य मेमोरियल फौंडेशन,
पुणे
Tuesday, 10 April 2018
Saturday, 7 April 2018
लढाई अध्ययन समस्येशी!
अभ्यासात मागे
पडणारी मुलं हा पालक, शिक्षक सर्वांच्याच चिंतेचा विषय! अभ्यासात मागे पडण्याची कारणं भिन्न भिन्न असतात. अंधत्व, कर्णबधिरता, इतर शारीरिक अपंगत्व यामुळे अभ्यास
करायला अडचण येते; तसेच
मतिमंदत्व, गतिमंदत्व, स्वतमग्नता, बहुविकलांगता अशा बौद्धिक, मानसिक स्तरांशी निगडीत असलेल्या
प्रश्नांमुळेही मुलं अभ्यासात मागे पडतात. या सर्व विशेष अडचणींवर मात कारण्यासाठी
त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे .
या सर्वांपेक्षा
वेगळ्या गटात मोडणारी काही मुले देखील अभ्यासात मागे पडत असतात. ही मुले 'अध्ययन अक्षम ' मुले म्हणून ओळखली जातात. या
मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण,
चांगली, उत्तम
असते. त्यांच्यामध्ये कोणतेही शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग नसते. ही मुले वरील पैकी
कोणत्याही गटात मोडत नाहीत आणि तरीही अभ्यासात मागे पडत असतात. मेंदूची कामं करण्याची भिन्न पद्धत, अध्ययनासाठी
आवश्यक असलेल्या काही घटकांमधला बदल आणि अनुवांशिकता या कारणामुळे हे होते. जगभरातील आकडेवारीनुसार दहा टक्के लोक हे या
गटात मोडतात. आपण नुसत्या पुण्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तरी हे प्रमाण किती प्रचंड असेल याचा
अंदाज बांधू शकतो.
पुणे पालिकेच्या
वेबसाइटनुसार, इयत्ता
पहिली ते चौथी या वयोगटात अंदाजे १,२४,००० मुलं मुली शिकतात. आपण फक्त याच मुलांबरोबर काम करायचं ठरवलं, तरी हि संख्या १२,४००! म्हणजे एकट्या पुण्यात कितीतरी
संस्थांनी यावर काम करायला हवे आहे.
आजमितीस पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली
अशा काही मोजक्या शहरांमध्ये हे काम चालते. पण बहुतांश ठिकाणी पाश्चिमात्य देशांचे
कार्यक्रम जसेच्या तसे राबवले जातात.
या गटात मोडणाऱ्या
मुलांसाठी आम्ही पुण्यात सहकारनगर भागात एक केंद्र सुरु केले आहे. तिथे या
मुलांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याबरोबरच या विषयातील संशोधन आणि विकसनासाठी प्रयत्न
केले जातात; पण
या मुलांचा उल्लेख आम्ही जाणीवपूर्वक "अध्ययन समस्या" असलेली मुलं असा
करतो. "अध्ययन अक्षमता" या प्रचलित शब्दामुळे ही मुले 'अपंग', 'बिचरी' वाटतात.
या मुलांना सर्वसाधारण पद्धतीने अधययन करण्यात समस्या असते ही वस्तुस्थिती आहे; पण याचा अर्थ ती अध्ययन करायला अक्षम
असतात असं नव्हे.
पूर्णतः चारचौघांसारखी
दिसणारी ही मुले लेखन, वाचन, गणित या विषयांमध्ये मागे पडतात. त्यांची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे
सर्व अभ्यास विषय त्यांना कळतात. तोंडी उत्तरही देते येतात; पण जे समजलं आहे ते अचूकपणे लिहिता येत
नाही. ही मुलं आपल्या पठडीतल्या पद्धतीने शिकू शकत नाहीत; पण
त्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्याला 'रेमेडीअल टीचिंग' असं म्हणतात; पण केवळ 'रेमेडीअल टीचिंग' कारण म्हणजे जखम पूर्ण साफ न करता
मलमपट्टी करण्यासारखं आहे. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वंकष प्रयत्न
होण्याची गरज आहे.
याच उद्देशानं आमच्या
केंद्रात या मुलांबरोबर काम करताना निरनिराळ्या थेरपींचा वापर केला जातो; तसंच या मुलांमधील विविध क्षमता
ओळखण्यासाठी, त्या
वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या मुलांचा कल ओळखण्यासाठी त्यांची 'कल चाचणी' घेतली जाते व त्यानुसार त्यांनी
कोणत्या क्षेत्रात जाणे फायद्याचे ठरेल या विषयी देखील मार्गदर्शन केले जाते. केवळ
या मुलांबरोबर काम करून थांबता येणार नाही. ही मुले पुढे जायची असतील तर त्यांचे
पालक, शिक्षक आणि
सामाज्याच्याही दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही शिक्षक आणि
पालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेतो.
या मुलांना जशा काही मर्यादा /समस्या असतात
तशीच त्यांची काही बदलस्थानही असतात. या मुलांमध्ये इतरांपेक्षा अधिक कुतूहल असते, त्यांची विचार करण्याची पद्धत खूप
भिन्न असते. निर्मितीक्षमता, कल्पकता, संवेदनशीलता, उच्च भावनांक, इतरांशी संवाद साधण्याची हातोटी, निसर्गविषयक विस्तृत जाणीवा या विषयात
ही मुले चांगली असतात. त्यांच्या या गुणांमुळेच ती शास्त्रज्ञ, संगीतकार, समाजसेवक, राजकारणी, खेळाडू, उद्योजक होऊ शकतात. जगभरात या गटात मोडणारी नावं आहेत- एडिसन, आइनस्टाइन, ग्रॅहम बेल, व्हॉल्ट डिस्ने, चर्चिल, हेनरी फोर्ड. पण ही सर्व नावं पाश्चिमात्य आहेत. कारण त्यांच्याकडे
हा विषय समजावून घेऊन गेले शतकभर काम सुरु आहे. आपल्याकडे मात्र या कामाची अजून पहाट होत आहे. मात्र, सजगपणे
प्रयत्न झाल्यास गटात मोडणारी भारतीय मुलेही त्यांच्यामधील क्षमता सिद्ध करू
शकतील. आता नवीन शासकीय नियमांप्रमाणे ही 'अध्ययन समस्या' असलेली
मुले 'नापास' होऊ शकत नाहीत. पण म्हणून आपण पालक जर
गाफील राहिलो, तर
या मुलांचे नुकसान होत राहील. आता आपली मुले नापास होणार नसली, तरी त्यांना अभ्यासात अडचणी आहेत हे तर
आपल्याला लक्षात येताच असेल. शाळा आठवी-नववी पर्यंत नापास करणार नाही पण पुढे काय? तेव्हा नापास झाल्यावर मग आपल्या
अभ्यासात मागे पडणाऱ्या या मुलांकडे लक्ष देणार आहोत का आपण? तेव्हा फार उशीर झालेला असेल. कारण
आपला मेंदू संस्कारक्षम असतो. त्याला जितक्या लहान वयापासून शास्त्रशुद्ध
प्रशिक्षण मिळेल तितक्या जास्त प्रमाणात मेंदू वेगळ्या पद्धतीने, अधिक चांगले शिकू शकतो. त्यामुळे
शासकीय नियमांची वाट न पाहता तातडीने कामाला लागले पाहिजे. आपले मुलं ही आपली
जबाबदारी आहे शासनाची नाही! या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीच्या उपक्रमात आपणही
सहभागी होऊ शकता. (संपर्क- ९८५०८८३८७५)
-क्षिप्रा रोहित
Tuesday, 3 April 2018
Sensitizing the teachers and parents...
School
teachers and parents attending a special training session to understand
and handle learning difficulties among the children. We, at Dr. Shanta
Vaidya Memorial Foundation, believe that understanding the learning
difficulties faced by children is first and most important step in the
process of helping children overcome them and achieve higher learning
levels.
Let us together identify and understand the difficulties, sensitize and empower the teachers, and work with children on academic and psychological levels.
Join us if you think you can contribute in any of these activities...
Let us together identify and understand the difficulties, sensitize and empower the teachers, and work with children on academic and psychological levels.
Join us if you think you can contribute in any of these activities...
Subscribe to:
Posts (Atom)




