'अध्ययन आक्षमतेला ' समजून घेण्याची गरज
ऑक्टोबर महिना जगातील काही देशांमध्ये अध्ययन अक्षमता जाणीव जागृती
महिना म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्ताने ....
ऑक्टोबर महिना जगातील काही देशांमध्ये ‘अध्ययन अक्षमता जाणीव जागृती महिना’ म्हणून ओळखला जातो. एक अख्खा महिना
स्वतःसाठी राखून ठेवणारा हा विषय नेमका काय आहे, हे समजावून
घेण्याची गरज आहे.
अध्ययन अक्षमता म्हणजे सर्वसाधारण, चांगली, उत्तम,
अतिउत्तम
बुद्धिमत्ता असतानाही लेखन, वाचन, गणित अशी
शैक्षणिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी मुलांना येणारी अडचण. या प्रमुख अडचणींबरोबरच
दिशा कळण्यामध्ये गोंधळ होणे, वेळ चटकन न समजणे, वयानुरूप
अपेक्षित असलेले अंतराचे, आकारमानाचे, वजनाचे अंदाज
बांधता न येणे, पाढे, कविता, प्रार्थना पाठ न होणे अशी काही छोटी छोटी लक्षणेही या मुलांमध्ये
दिसतात. विश्वास बसणे अवघड आहे पण
वस्तुस्तिथी अशी आहे, की कोणतेही शारिरिक, मानसिक, बौद्धिक व्यंग
नसतानाही ही मुले अभ्यासात मागे पडत असतात. यांच्या वह्या, परीक्षेतील पेपर
पूर्ण होत नाहीत. विषय समजतो,
तोंडी उत्तर देता येतात पण परीक्षेत गुण मिळवता येत नाहीत. हि मुले गतिमंदत्व, मतिमंदत्व,
स्वमग्नता,
बहुविकलांगता,
सेलेब्रल
पाल्सी अशा कोणत्याच गटात मोडत नाहीत आणि
तरीही शिक्षणात मागे पडत असतात. याला ‘छुपे अपंगत्व’
असे म्हणतात. त्यांच्यावर शिक्के मारून त्यांना बाद करणे हि आपली प्रतिक्रिया,
हा
परिणाम आहे या आपल्या या विषयातल्या अपुऱ्या माहितीचा.
आनुवंशिकतेमुळे असणारी मेंदूमधील भिन्न रचना हे अध्ययन अक्षमतेचे
प्रमुख कारण आहे. अनुवंशिकता नसतानाही क्वचित कधी तरी जन्माच्या वेळी झालेल्या
गुंतागुंतीमुळे मुलांमध्ये अध्ययन अक्षमता दिसून येते. या रचनाभिन्नतेमुळे मुलांना
पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेण्यात अडचण येते. पण याचा अर्थ हि मुले शिकू शकत नाहीत
असा नाही. 'रेमेडील टीचिंग' हा त्यावरच उपाय आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये या विषयावरचे काम १८३० मध्ये सुरु झाले.
त्यानंतर या विषयांवरचे संशोधन अव्याहत सुरु आहे. निरनिराळ्या पद्धती, साधने
उपलब्ध आहेत. यातून एक गोष्ट सिद्ध झाली, कि या मुलांना अभ्यासात अडचण असली
तरीही त्यांची बहुविध बुद्धिमत्ता खूप चांगली असते. ही मुले संशोधक, नेते,
समाजसेवक,
कलाकार,
उद्योजक
होऊ शकतात. चर्चिल, एडिसन, आईन्स्टाईन, वॉल्ट डिस्ने, हेन्री फोर्ड ही
या गटातील सुरवातीची काही यशस्वी उदाहरणे होय. ही परंपरा तिथे अजूनही चालूच आहे.
भारतात या गटात मोडणाऱ्या मुलांच्या बहुविध बुद्धिमत्तेचा उपयोग करून
त्यांना पुढे नेणे घडत नाही. आपण
ज्या पद्धतीने त्यांना वागवतो, त्यामुळे
त्यांच्यामध्ये नैराश्य, आत्मविश्वासाचा
अभाव, अतिचिंता, न्यूनगंड यासारख्या नकारात्मक भावना
निर्माण होतात. सुमारे ७९% मुलांमध्ये या गोष्टी आढळतात (संदर्भ- निमहान्स या बंगळुरू संस्थेतील अभ्यास) यातूनच मग इतर
सामाजिक प्रश्न तयार होतात. जागतिक स्तरावरचे सर्वेक्षण असे सांगते, की जगभरातील दहा टक्के लोकसंख्या या
गटात मोडते. (संदर्भ- हँडबुक व पुअर स्कूल परफॉर्मन्स, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन,
दिल्ली २००२) भारताचा विचार करता हा
आकडा खूप मोठा होता. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार भारतभरात शालेय शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांची आज २४ कोटी ८२ लाख ५१हजार ५५६ संख्या आहे. देशभरात दोन कोटी ४८
लाख २५ हजार १५५ मुलांकडे आपण लक्ष देण्याची व मदतीची गरज आहे.
क्षिप्रा रोहित
डॉ. शांत वैद्य मेमोरियल फौंडेशन,
पुणे

No comments:
Post a Comment